स्त्री लंपटपणा भोवलं माजी महापौर मनोहर सपाटेंची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून हकालपट्टी
शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अधिकृत पत्राद्वारे केली कारवाई

ब्रेकिंग ! स्त्री लंपटपणा भोवलं माजी महापौर मनोहर सपाटेंची राष्ट्रवादी शरद पवार पक्षातुन हकालपट्टी
ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी
सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली असून त्यांची आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.
मनोहर सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. केवळ गुन्हा दाखल झाला नाही तर संबंधित महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोलापूर शहरात शुक्रवारी दिवसभर याच व्हिडिओची चर्चा ऐकण्यास मिळाली.
मनोहर सपाटे यांच्या कृत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचंड बदनामी झाली असून याप्रकरणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आल्याचे शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी त्याबाबतचे अधिकृत पत्र सोलापूरच्या माध्यमांकडे दिले आहे.
#सोलापुर शहर उत्तर #मनोहर सपाटे #राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष