मानाचा आजोबा गणपती ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
६५० विद्यार्थ्यांना केले वह्यांचे वाटप दिवंगत ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटेनी सुरु केलेली सामाजिक बांधिलकी आजतागायत सुरुच

श्री आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने 650 विद्यार्थ्यांना वह्या भेट देण्यात आले
सोलापूर :श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून समाजातील सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणा प्रती आवड निर्माण व्हावी या मागचा उद्देश ठेवून वह्या वाटप करण्यात येते.
आज रोजी दुपारी पाच वाजता श्री आजोबा गणपती मंदिरात ६५० गरजू विद्यार्थ्यांना ट्रस्टचे नूतन अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख , राजू रेवणकर सराफ, आनंद चंदनशिवे,माजी नगरसेवक अमर पुदाले, यांच्या शुभहस्ते वह्या प्रदान करण्यात आले…
याप्रसंगी ट्रस्टचे नूतन अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या 30 वर्षापासून शालेय साहित्य वाटप असो वह्या भेट देण्याचे उपक्रम असो हा समाजाप्रती स्तुत्य उपक्रम राबविला जातो.. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन एक दर्जेदार व उत्तम शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होते.. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढतो आणि आपले पुढील शालेय शिक्षणासाठी प्रेरणा मिळतो अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वह्या भेट देत असताना शुभेच्छा देऊन प्रतिपादन केले…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष काका मेंडके,सचिव अनिल सावंत खजिनदार चंद्रशेखर कळमकर,सहसचिव कमलाकर करमाळकर, कार्यकारणी सदस्य राहुल कुमणे, गंगाधर गवसने, सुरेश हाचडे, अमित काबने, शिवानंद अडगळे, अण्णाराव गवसने,अनिल नंदीमठ,सातलिंगप्पा दुधनीकर, भैया भास्कर,विशाल फुलारी सोमनाथ मेडके, प्रफुल झाडबुके,योगेश जेऊरे, बाळू उटगे,प्रवीण पाटील, सिद्धाराम सरसबी, सागर कोप्पद,रतिकांत स्वामी व गुरुनाथ निंबाळे आदींनी परिश्रम घेतले