सर्वपक्षीय इनिंग! काँग्रेस, भाजप, शिवसेना व शरद पवार गटाचे नेते-कार्यकर्ते ‘जनसुराज्य’त दाखल
माजी मंत्री कोरे सावकारांच्या पक्षाला सोलापुरात पसंती

जनसुराज्य शक्ती मध्ये काँग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
सोलापूर – आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सोलापूर शहरात जनसुराज्य शक्ती या पक्षाचा जुळे सोलापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीस जनसुराज्य शक्तीचे संपर्कप्रमुख रवींद्र कोरे यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीची माहिती देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी युवक व युवतींना या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिकिटे देणार असल्याचे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्ष वाढवण्याचे आवाहन केले.
काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सौ.सोनाली गुरुराज मोगे (भाजप), श्रीमती अन्नपूर्णा रामलाल शर्मा (भाजप),
सौ. कावेरी विनोद भोसले ( राष्ट्रवादी काँग्रेस), सौ. अश्विनी नितीन साबळे (राष्ट्रवादी काँग्रेस ),नितीन बनसोडे (काँग्रेस), सचिन पारिते (कांगेस),रहिम शेख (शिवसेना) लियाकतभली शेख (शिवसेना) आधी पदाधिकारी यांनी प्रवेश केले.
यावेळी शहराध्यक्ष विरेश सकरगी सोलापूर शहर, युवा अध्यक्ष, प्रविण कोणापुरे सोलापूर शहर उपाध्यक्ष,अनिल भागवत जाधव (अॅड. वकील) सोलापूर शहर (सल्लागार) आधी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
#जनसुराज्य युवाशक्ती पक्ष#विनय कोरे सावकार