ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण त्वरीत हटवा
सिध्दरामेश्वर भक्त समितीच्यावतीने पालिका आयुक्तांना निवेदन

सोलापुर,दि.३०
श्री सिध्दरामेश्वर देवस्थान भक्त समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन ग्रामदैवत सिद्धरामेश्वर परिसरातील समंती कट्टा ते महापालिकेपर्यंत पदयात्रेने मनपा डाॅ.सचिन ओंबासे यांना देण्यात आले ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असुन वेळीच ही अतिक्रमण हटवावीत तीर्थक्षेत्र उज्जैन,वाराणसीला केलेल्या काॅरीडाॅरच्या धर्तीवर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करुन मंदिर परिसरास पुरातन वैभव मिळवुन द्यावे अशी मागणी करण्यात आली.
यावर पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मत भक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार चोळ्ळे यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर व्यक्त केले.
भक्त समितीची मागणी पुढीलप्रमाणे.
१) लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा व मार्कंडेय मंदीर ते विजापुर वेस परिसरातील अनधिकृत बांधकाम व
अतिक्रमण हटाव.
२) स्मार्ट सिटी योजने अंतर्गत केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातुन करोडो रुपयांचा निधी उपलब्ध होत
असुन संपुर्ण राज्यातील अनेक मंदीरांचे पुर्नरोत्थान व सुशोभिकरण होत असुन फक्त सोलापूर
महानगरपालिकेच्या निष्क्रीय प्रशासनामुळे सोलापूर च्या श्री सिध्दरामेश्वर मंदीर परिसरासाठी राखीव
असलेल्या निधीचा गैरवापर होत असुन ह्या परिसराचे सुशोभिकरण न होता उलट विद्रुपीकरण होत असल्याचे
दिसुन येत आहे तसेच मागील अनेक वर्षापासुन शहरातील इतर ठिकाणचे अनधिकृत अतिक्रमणवर कारवाई
होते पण श्री सिध्दरामेश्वर मंदीर ते मार्कंडेय मंदीर परिसरातील अतिक्रमण कारवाई मात्र जाणुन बुजून टाळली
जाते. या मागे कोणत्या अदृश्य शक्ति कार्यरत आहेत हे मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे. १०० वर्षापूर्वी हे
मंदीर सभोवतालच्या मार्गावरुन चोहोबाजुने सहजपणे दिसत होते. पण आता ह्या मार्गावर अनधिकृत
अतिक्रमणाचा वेढा पडलेला असुन बाहेरुन मंदीर परिसर दिसतच नाही.
३) त्यासाठी मंदीर परिसर पुर्वीप्रमाणेच चोहोबाजुंच्या मार्गांवरुन दिसण्यासाठी राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांचा
विकासासाठी राबविण्यात येत असलेला विकास आराखडा अथवा कॉरीडोअर संकल्पना येथे राबवुन मंदीर
परिसराचे पुरातन नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार श्री सिध्दरामेश्वर मंदीर
व भुईकोट किल्ला परिसरातील (१०० मीटर) च्या आत झालेले अनधिकृत बांधकाम श्रावण महिन्याच्या आत काडण्यात यावे.अशी विनंती केली असता आयुक्त ओंबासे साहेब म्हणाले कि पुढील 8 ते 10 दिवसात कारवाई करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगीअध्यक्ष विजय चोळळे, शशिकांत बिराजदार, रमण कुलकर्णी, सुनील स्वामी बापुताज पाटील, केदार छत्रे, राम केळकर, संतोष तांबूलकर, शिवशरण दोडमणी सिध्दरामेश्वर भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.