महाराष्ट्रराजकीयशासकीयसोलापूर

सौ.गीताभारती रामपुरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

होटगी शिक्षण संस्थेसाठी खुप मोठे कार्य काशी जगदगुरुंचे गौरवोद्गार

 

 

सोलापूर: श्री. बृहन्मठ होटगी संचलित *भवानी पेठ* येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त *सहशिक्षिका सौ. गीताभारती रामपुरे मॅडम* यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यस्थानी संस्थेचे *अध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर धर्मरत्नं डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी* होते. प्रारंभी महास्वामीजी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

यासमयी *सौ. गीताभारती रामपुरे मॅडम* यांचा *सहकुटुंब यथोचित सत्कार* करण्यात आला. त्या *बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेच्या* विविध शाखांमध्ये तब्बल *38* वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत. त्याप्रित्यर्थ आज त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी सौ. रामपुरे मॅडम शाळेविषयी व संस्थेविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या,”बृहन्मठ होटगी संस्था व शाळा माझे कुटुंब आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी संस्थेचे कार्य करत राहीन. पूज्य महास्वामीजी हे माझ्यासाठी दैवतच आहेत. पूज्य महास्वामीजींच्या कृपाशीर्वादामुळे माझ्यावर अनेकदा आलेली संकटे नाहीशी झाली. स्काऊट गाईडच्या माध्यमातून मी राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचले ते केवळ पूज्य महास्वामींच्या आशीर्वादामुळेच.”

याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राम ढाले सर म्हणाले,”सौ. रामपुरे मॅडम या केवळ शिक्षिका म्हणूनच नव्हे तर स्काऊट-गाईडच्या उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून ओळखल्या जातात. त्या आल्यापासून आमच्या प्रशालेत क्रीडाशिक्षकांची उणीव आम्हाला भासली नाही. संस्थेच्या विविध शाखांमध्ये कार्य करताना स्काऊट गाईड सोलापूर यांच्यामार्फत 2009 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट गाईड संघ म्हणून प्रथम क्रमांक मिळवला. 2012 मध्ये गोरखपुर, उत्तरप्रदेश येथील शिबिरात सहभागी होऊन उत्कृष्ट महाराष्ट्र दर्शन ही ट्रॉफी संस्थेला मिळवून दिली. सुमारे 120 मुलींना स्काऊट गाईड अंतर्गत राज्य पुरस्कार मिळाले. 2017-18 या शैक्षणिक वर्षात तीन गाईडना राष्ट्रपती पदक मिळाले. भारत स्काऊट गाईड दिल्ली यांच्यामार्फत तीन गाईडना मानांकन मिळाले. यामुळे आपल्या संस्थेची मान उंचावली गेली. सौ. रामपुरे मॅडम यांना उत्कृष्ट गाईडनर मानांकन माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मिळाला. संस्थेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला.”

याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. शांतय्या स्वामी सर म्हणाले, “सौ. रामपुरे मॅडम यांचे कार्य संस्थेत अवर्णनीय आहे. त्यांना भावी जीवन सुखी, समृद्ध व आरोग्यदायी लाभो, ही महास्वामीजींच्या चरणी प्रार्थना.”

याप्रसंगी कार्यक्रमाचे *अध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी* आपल्या आशीर्वचनात म्हणाले,”रामपुरे मॅडम यांच्यातील जिद्द हा गुण वाखाणण्यासारखा आहे. संस्थेसाठी त्यांनी खूप मोठे कार्य केल्याचे दिसून आले. त्यांच्या या योगदानामुळेच त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास मी आपल्या संस्थेची सर्व नियोजित कामे रद्द करून त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालो. त्यांच्या कार्यातून शिस्त व संस्कार दिसून आले. त्यांनी आज दिलेली भेट संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रूपात देण्यात येईल.”

कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य *श्री. रामेश्वर झाडे सर, पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* यांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी कन्नड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवशरण खेडगी सर, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *कविता स्वन्ने* मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button