आस्था सामाजिक संस्था दिपकभाऊ निकाळजे संघटनेचा स्तुत्य उपक्रम
वारकऱ्यांना दैनंदिन जीवन उपयोगी साहित्य कीटचे वाटप

आस्था सामाजिक संस्था व दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीतील 700 भक्तांना दैनंदिन जीवन उपयोगी साहित्याचे वाटप
आज दिनांक 29 जून 2025 रोजी श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव येथून निघून पायी प्रवास करत प्रभाकर महाराज मंदिर येथे आगमन झाले तेथून निघून सम्राट चौक,बाळीवेस,चाटी गल्ली,पूर्व मंगळ पेठ भुसार गल्ली जैन मंदिर या ठिकाणी आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्था व दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वतीने प्रथम गजानन महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिंडीतील पायी चालणाऱ्या 700भक्तांसाठी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जीवन उपयोगी साहित्याचे साबण ,तेल, टूथपेस्ट, बुश पावडर, झेंडू बाम, अंगाला लावायचे साबण, सुमो स्प्रे, नॅपकिन टावेल इ.किट वाटप पूर्व मंगळवार पेठ पोलीस चौकीचे पी .एस.आय शेख मॅडम, आनंद तालिकोटी ( अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था) शिवानंद सावळगी ( सचिव आस्था सामाजिक संस्था) सुहास छंचुरे ( प्रसिद्धी प्रमुख) वेदांत तालिकोटी, राम क्षिरसागर ,सिद्धू बेऊर पिंटू कस्तुरे यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले.
पालखीतील भक्तांनी दैनंदिन जीवन उपयोगी साहित्य पाहून आस्था सामाजिक संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले .
याप्रसंगी पूर्ण मंगळवार पोलीस चौकीचे पी एस.आय शेख मॅडम यांनी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या दैनंदिन जीवनातील साहित्याचा वाटपाबद्दल संस्थेचा गौरव केला हे उपक्रम कौतुकास्पद आहे आस्था सामाजिक संस्था नेहमी गोरगरीब, वंचित घटकासाठी नेहमी कार्यरत असते हे कार्य पुढेही चालू ठेवण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज छंचुरे अथर्व शिंदे अथर्व कोळुरे, बसवराज बेऊर,राज बेऊर,आकाश वाघमारे, प्रथमेश व्हड्राव ,अप्पा साखरे, प्रमोद छंचुरे यांनी परिश्रम घेतले
#सामाजिक #सोलापुर