महाराष्ट्रराजकीयसोलापूर

सोलापुरात शिवसेना उध्दव (बाळासाहेब ठाकरे) मनसे पदाधिकाऱ्यांची ऐतिहासिक बैठक

महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र येण्याचा निर्धार

 

सोलापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे पदाधिकाऱ्यांची ऐतिहासिक बैठक; महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र येण्याचा निर्धार

 

सोलापूर, दि. ७ जुलै – सोलापूर शहरात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. महाराष्ट्र धर्म आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक पदाधिकारी एकत्र आले. या बैठकीचे आयोजन शिवसेना जिल्हा समन्वयक डॉ. प्रा. अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

 

या प्रसंगी डॉ. अजय दासरी यांनी सांगितले की, “आमचा महाराष्ट्र धर्म हाच झेंडा आणि अजेंडा आहे.” महाराष्ट्राची ओळख जपणे, मराठी माणसाचा हक्क प्रस्थापित करणे आणि येणाऱ्या काळात सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर एकत्र लढण्यासाठी दोन्ही पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

बैठकीसाठी मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांना चहाच्या खास आमंत्रणावर आमंत्रित करण्यात आले होते. चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आपली मते मांडताना भावनिक झाले आणि भविष्यातील संघर्ष एकत्र लढण्याचा निर्धार त्यांनी केला.

 

या बैठकीत महाराष्ट्रात मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी, स्थानिक रोजगार, शिक्षण, संस्कृती, आणि भाषेच्या रक्षणासाठी दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याचा ठराव झाला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, महाराष्ट्र धर्म हा एकमेव ध्येय असावा अशी भूमिका यावेळी दोन्ही बाजूंनी मांडण्यात आली.

 

मनोमिलनाची ही बैठक सोलापूरच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पुढील काळात संयुक्त उपक्रम, मोर्चे व आंदोलन यांचीही आखणी केली जाणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

याप्रसंगीशिवसेना जिल्हाप्रमुख डॉ प्रा.अजय दासरी यांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकीस उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर जिल्हा संघटक शरणराज केंगनाळकर, शशिकांत बिराजदार, नागेश सोलनकर , अंबादास चव्हाण, बंटी बेळमकर

0 मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख,अमर कुलकर्णी,जयवंत हाके ,संतोषकुमार घोडके, प्रकाश कोळी, गजभार सर, जितेंद्र टेंभुर्णीकर ,रोहित कलशेट्टी ,नागेश पासकंटी , गोविंद बंदपट्टे इ उपस्थित होते.

#शिवसेना उबाठा#महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button