सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक २०२५/३०
व्यापारी संघटनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा थाटात शुभारंभ

सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक
व्यापारी संघटनेच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ
सोलापुर. दि,21.सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुक २०२५/३० साठी दिनांक २७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे व्यापाऱ्यांच्या हितासाठी सिद्धेश्वर मार्केट यार्डातील सर्व व्यापारी संघटनेचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी १० मार्केट यार्डातील अष्टभुजा देवी मंदिरात नारळ फोडुन करण्यात आला.
सर्व व्यापारी संघटनेचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक १ मुश्ताक अहमद सरदारसाब चौधरी अनुक्रमांक २ वैभव चंद्रशेखर बरबडे
यांनी मार्केट यार्डातील सर्व मतदार व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मार्केट कमिटीच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
सदर प्रसंगी भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिकळ्ळी,सोलापुर कॅन्व्हासिंग एजंट असोसिएशन अध्यक्ष श्रीशैल अंबारे,कस्तुरबा भाजी मंडई व्यापारी असो हंगामी अध्यक्ष रेवणसिद्ध आवजे,सोलापुर दाळ मिल ओनर्स असो अध्यक्ष प्रविण भुतडा,राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई व्यापा असो अध्यक्ष रियाज बागवान,किराणा मसाला व्यापा असो अध्यक्ष प्रविण ओसवाल,मिरची आडत खरेदी संघ अध्यक्ष अयुब कल्याणी,बारदान व्यापा संघअध्यक्ष मल्लिनाथ कटाप,ऑईल मिल ओनर्स असो अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी, सिध्दय्या स्वामी हिरेमठ,केदारनाथ उंबरजे प्रकाश विभुते,,सिद्धाराम बावकर,प्रकाश हत्ती यांच्यासह मार्केट यार्डातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक २०२५/३०#मार्केट यार्ड #Vijaykumardeshmukh #Subhash deshmukh#Sachin Kalyanshetti#Dilip Mane #Suresh Hasapure#devendra Kothe