महाराष्ट्रसोलापूर

वीरशैव व्हिजनतर्फे शुक्रवार पासुन बसव व्याख्यानमाला

यंदाचे व्याख्यानमालेचे ११ वे वर्ष

वीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमाला

 

यंदाचे व्याख्यानमालेचे 11 वे वर्ष

 

सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 ते 27 एप्रिल दरम्यान रोज सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाचे व्याख्यानमालेचे 11 वे वर्ष असून या तीनदिवसीय बसव व्याख्यानमालेतील पहिले पुष्प शुक्रवार, 25 एप्रिल रोजी डॉ. गिरीश जाखोटीया (मुंबई) हे ‘महात्मा बसवेश्वर व 21 वे शतक’ या विषयावर गुंफणार आहेत. या पहिल्या पुष्पाचे उ‌द्घाटन आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सोलापूर नागरी बँक असोसिएशनचे चेअरमन प्रकाश वाले, महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दुसरे पुष्प शनिवार, दि. 26 एप्रिल रोजी इंद्रनील बंकापुरे कोल्हापूर हे ‘मंदिराच्या देशा’ या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उदघाट्न आ. प्रवीण स्वामी (उमरगा) यांच्या हस्ते व मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे, श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, उद्योजक पंडित जळकोटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

रविवार, दि. 27 रोजी नारायण पुरी यांच्या ‘हास्यधारा’ या विनोदी कार्यक्रमाने या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन आ. देवेंद्र कोठे, यांच्या हस्ते आणि माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज ५ श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी सोलापूरवासियांनी या बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

#वीरशैव व्हिजन #सोलापुर #बसव जन्मोत्सव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button