महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
142 रक्तदात्यांनी रक्तदान करुन दिले योगदान

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी सोन्या मारुती गणपती येथे महाआरती करण्यात आली.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर,लोकसभाध्यक्ष प्रशांत इंगळे,शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख,वाहतूक सेनेचे जितेंद्र टेंभुर्णीकर ,राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी , संतोषकुमार घोडके,सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांची पत्नी अर्चना इंगळे ,जावई गणेश भोसले आणि मुलगी संध्या भोसले आदींनी रक्तदान केले.
मनसेच्या या रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता गणपतीची महाआरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या रक्तदान शिबिरासाठी शहर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते.सोलापूर शहरासह अक्कलकोट ,मोहोळ, दक्षिण सोलापूर ,उत्तर सोलापूर ,उळे येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहात रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग नोंदवला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, जैनोद्दीन शेख, अमर कुलकर्णी, अभिषेक रंपुरे, जयवंत हाक्के, जितेंद्र टेंभुर्णीकर, संतोषकुमार घोडके, श्रीधर गुडेली, प्रसाद कुमठेकर, सुभाष माने, पवन देसाई, जयश्री हिरेमठ, करुणा यादव, रुपाली माळवदकर, रोहित कलशेट्टी ,नागेश पासकंटी, गोविंद बंदपट्टे, संध्या भोसले, गणेश भोसले, अर्चना इंगळे, कल्पना कांबळे, सुनिता जाधव, सागर जिडगी, बापु रेड्डी, प्रकाश कोळी, वीरसंगप्पा भोज, सचिन पाटील, प्रभाकर कारंडे, संतोष बारटक्के, विशाल गुजले, इश्वर अतनुरे, आकाश करजगी, सुमित पवार, राम रेड्डी आदी उपस्थित होते.
#महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र
राज ठाकरे यांचा आदेश शिरसावंद मानत कोविड काळात देखील सोलापूर मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.आज राज साहेबांचा वाढदिवस आणि जागतिक रक्तदान दिन असल्याने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले.भविष्यात देखील असे समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातील.
- विनायक महिंद्रकर – जिल्हाध्यक्ष मनसे