मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापुर शहर व जिल्ह्याच्यावतीने आवाहन

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सोलापुर:दि,१३. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्या मारुती चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालय येथे शनिवार दिनांक १४ जून रोजी सकाळी ९ वाजता सोन्या मारुती गणपतीची महाआरती करण्यात येणार असुन तदनंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व राजसाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात उत्सफुर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापुर शहर व जिल्ह्याच्यावतीने करण्यात आले आहे.
#महाराष्ट्र नवनिर्माण सेना#राज ठाकरे#MnsSolapurMaharashtra