वीरशैव लिंगायत समाजातील सदाबहार व्यक्तीमत्व हरपला
लिंगैक्य चिदानंद वनारोटे यांच्या शोकसभेत मान्यवरांची श्रध्दांजली

वीरशैव लिंगायत समाजातील सदाबहार व्यक्तीमत्व हरपला……
सोलापूर:- सामाजिक,धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात मदतीचा हात देणारा व स्वतःला झोकून देऊन काम करणारा व्यक्ती म्हणजेच माजी नगरसेवक कै चिदानंद वनारोटे..
यांचे दि. 20 जून २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले त्यांच्या निधनाने वीरशैव लिंगायत समाजात खुप मोठी पोकळी निर्माण झाले. त्यानां आदराजंली वाहण्यासाठी दि 22 जून २०२५ रविवार रोजी दु 5 वाजता महावीर सांस्कृतिक भवन येथे श्री आजोबा गणपती टूस्ट, श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी, मध्यवर्ती बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ, महेश को ऑप बॅक, व सोलापूर पाजरापोळ यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते..
याप्रसंगी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी कै चिदानंद वनारोटे यांच्या सोबत काम असताना आलेल्या प्रसंगाची आठवण करून देऊन त्यांच्या प्रामाणिक, जिद व सचोटी पणाच्या व्यक्तीमत्वाला उजाळा दिल्या….
श्री शिवपुत्र अप्पाजी, श्री जगदीश पाटील (माजी नगरसेवक ), श्री बाळासाहेब भोगडे (विश्वस्त श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी ), श्री नरेंद्र गंभीरे ( चेअरमन सिध्देश्वर सहबँक ), श्री सिद्धाराम चाकोते ( व्हाईस *चेअरमन . सिध्देश्वर सह साखर कारखाना ) अड मल्लिनाथ शाबादी, श्री शंकर पाटील C (संचालक महेश को-ऑपरेटिव बँक ) श्री प्रकाश वाले( माजी चेअरमन सिद्धेश्वर सहकारी बँक ), श्री गुरुराज माळगे चेअरमन सोलापूर गोशाळा श्री विजय शाबादे (विजापूर रोड मध्यवर्ती महामंडळ) श्री नागनाथ पाटील, (निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक ),श्री राजाभाऊ रोडगीकर, श्री युवराज व्हरटे सर,प्राध्यापक गजानन धरणे सर ( प्राचार्य सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक), श्री बसवराज येरटे ( अध्यक्ष मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ) मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर श्री दीपक आलूरे (माझी व्हाईस चेअरमन सिद्धेश्वर सहकारी . उत्तर ) यांनी शोक संदेश व्यक्त करीत कैलासवासी चिदानंद वनारोटे यांना श्रद्धांजली वाहिली…
सर्व उपस्थित मान्यवर व विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून कै चिदानंद वनारोटे यांना श्रद्धांजली वाहिली..
- वनारोटे परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थेचे विश्वस्त, सदस्य,राजकीय व्यक्ती यांचे कै चिदानंद वनारोटे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आमच्या परिवारावर कोसळलेल्या या दुःखात सहभागी होऊन आधार दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले
#शुक्रवार पेठ वीरशैव लिंगायत समाज#मानाचा आजोबा गणपती#श्री सिद्धेश्वर देवस्थान