महाराष्ट्रशासकीयसोलापूर
श्री.निलकंठ समाज संस्थेच्यावतीने गुणवंताचा सत्कार
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे करण्यात आले वाटप

श्री नीलकंठ समाज संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वही वाटपाचा कार्यक्रम दिनांक 22 जून 2025 वार रविवार रोजी श्री नीलकंठेश्वर मंदिर भवानी पेठ घोंगडे वस्ती येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पवन परदेशी सर हे उपस्थित होते. तसेच इतर मान्यवर समाजाचे ट्रस्टी श्री राजाराम बोगयागारू, अध्यक्ष श्री श्रीनिवास ईराबत्ती, श्री नागेश जी वल्याल, श्री बालाजी आबात्तिनी, श्री रामचंद्र कडवेरगु, श्री शिवलीला नागरी सह पतसंस्थेचे चेअरमन श्रीनिवास चिरलंची, समाजाचे माजी अध्यक्ष श्रीनिवास वल्याल, कृष्णाहरि चिंता व इतर मान्यवर प्रकाश मरगल, भास्कर ईराबत्ती, देविदास ईराबत्ती, नागेश मरगल, अक्षय चिंता, नागराज आबात्तिनी व नागेश बोड्याल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीनिवास गोंड्रा व विक्रम आबात्तिनी यांनी केले.