महाराष्ट्रसोलापूर

श्रीशैल शिरोळकर स्वामी यांच्या मागणीला यश

श्रीशैल ज्योतिर्लिंग निशुल्क स्पर्श दर्शनाला सुरुवात मंगळवार ते शुक्रवार मिळणार भाविकांना लाभ

श्रीशैल शिरोळकर स्वामी यांच्या मागणीला यश

आंध्र प्रदेशातील श्रीशैलम ज्योतिर्लिंग स्पर्श दर्शन राहणार आठवड्यातून चार दिवस

 

सोलापुर,दि.२५ श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात प्रतिवर्षी गुढीपाडव्यानिमित्त सेवा करण्यासाठी १०० ते १५० स्वयंसेवकांची टीम घेऊन पंधरा दिवस सेवा बजाविणारे सोलापुरातील श्रीशैल शिरोळकर स्वामी हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक असुन गेले पंचवीस वर्ष सेवा टीमसह श्रीशैल मल्लय्या चरणी सेवा अर्पण करत असतात.

आंध्र प्रदेशात बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसरे ज्योतिर्लिंग श्रीशैल मल्लिकार्जुन असुन बाराही महिने भाविकांची अलोट गर्दी असते सोलापुर शहर व जिल्ह्यातून अनेक भाविक श्रावण महिना गुढीपाडवा या व्यतिरिक्त इतरवेळीही भाविक श्रीशैलम येथे दर्शनासाठी जात असतात.

श्रावण महिना,गुढीपाडवा,महाशिवरात्र याशिवाय इतरवेळी श्रीशैल ज्योतिर्लिंग स्पर्श दर्शन दिले जात नव्हते यामुळे अनेक भाविक अलंकार दर्शन घेऊन परतत अनेक भाविकांच्या स्पर्श दर्शनाची मागणी ओळखुन श्रीशैल शिरोळकर स्वामी यांनी श्रीशैल मंदिर व्यवस्थापनाशी याबाबत यशस्वी पाठपुरावा करत १ जुलै २०२५ पासुन  आठवड्यातून चार दिवस मंगळवार ते शुक्रवारी दुपारी १.४५ ते ३.४५ या वेळेत सुलभतेने  निशुल्क दर्शन देण्याचे परिपत्रक मंदिर प्रशासनाने काढल्याची माहिती श्रीशैल शिरोळकर (स्वामी) दिले आहे.

याकामी श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ.चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांचेही मोलाचे योगदान लाभले.

#श्रीशैलम आंध्र प्रदेश #सोलापुर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button