वांगी गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीवर महायुतीचा झेंडा

वांगी गावच्या विविध कार्यकारी सोसायटीवर महायुतीचा झेंडा
द.सोलापुर – वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे श्री चिदानंद जळकोटे सर हे चेअरमन म्हणून अनेक वर्ष पद भूषवित होते. त्याने दिनांक 9 मार्च रोजी आपला चेअरमन पदाचा राजीनामा सादर केला व त्या जागेवरती वांगी गावचे माजी उपसरपंच श्री प्रकाशजी विभुते सावकार महायुतीचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली व त्याचबरोबर सौ वैशाली बाबुराव मलाव यांचीही व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली सध्या वांगीच्या ग्रामपंचायतीवर विद्यमान आमदार माननीय सुभाष बापू देशमुख यांचा वर्चस्व असून आता सोसायटी ही महायुतीच्या माध्यमातून बापू यांनी ही सोसायटी आपल्या ताब्यात घेतली आहे. सदर निवडीसाठी सौ वी ए शिंदे मॅडम अध्यक्षीय अधिकारी यांनी कामकाज बजावले तर सोसायटीच्या सेक्रेटरी श्रीकांत बनशेट्टी साहेब यांनी कामकाज पाहिले या निवडीने वांगी गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. निवडीनंतर माझी चेअरमन जवळ कोठे सर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नूतन चेअरमन श्री प्रकाशजी विभुते सावकार यांचा व नूतन व्हाईस चेअरमन सौ मल्लाव मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला या निवडीस वांगी गावचे माजी चेअरमन श्री काका पाटील सर माजी सरपंच शामरावजी हांडे साहेब राजकुमार जी तोडकरी राजकुमार पाटील साहेब प्राध्यापक सुभाष चंद्र बिराजदार फिरोज शेख शफिक शेख यल्लाप्पा बनसोडे वैभव विभुते बाबासाहेब तोडकरी यांच्यासह सोसायटीचे सदस्य व गावकरीही उपस्थित होते