श्रीशैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग स्पर्श दर्शन या तारखेपर्यंत राहणार
मंदिर प्रशासनाचे नेटके नियोजन श्रीशैल जगदगुरुंनी केले आवाहन

गुढीपाडव्या निमित्त श्रीशैल मल्लिकार्जुन स्पर्श दर्शन या तारखेपर्यंत राहणार-श्रीशैल जगद्गुरु
गुढीपाडव्या निमित्त आंध्र प्रदेशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीशैल मल्लिकार्जुन लिंगाचे स्पर्श दर्शन दि.15 मार्च ते 26 मार्च दरम्यान असुन यानंतर 27 मार्च ते 30 मार्चपर्यंत अलंकार दर्शन राहणार असल्याची माहिती श्रीशैल पीठाचे जगदगुरू डाॅ.चन्नसिध्दाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी कर्नाटकातील विजयपुर येथील श्रीशैल मल्लिकार्जुन भक्त मंडळांने आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत दिली.
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे गुढीपाडव्या निमित्त मोठी यात्रा भरत असते यात प्रामुख्याने कर्नाटक महाराष्ट्रातुन हजारो भाविक पदयात्रेने श्रीशैलम येथे दर्शनासाठी येत असतात.
श्रीशैलम येथे देवस्थान प्रशासनाने नेटके नियोजन केले असुन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नसल्याचेही श्रीशैल जगदगुरुंनी यावेळी सांगितले.