महाराष्ट्रक्राईमराजकीयशासकीयसोलापूर
काशी जगदगुरु डाॅ.मल्लिकार्जुन शिवाचार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार
सिध्दनकेरी महाराजांना मारहाण करणार्यांवर कडक शासन करण्याची करणार मागणी

मंगळवेढा येथील सिध्दनकेरी,येथे श्री 1008 सिध्दनकेरी शिवाचार्य महाराज संस्थान आहे या मठात वास्तव्यास असलेले राचोटेश्वर शिवाचार्य महास्वामींना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती, सद्या हिंदू रक्षक म्हणून घेणारे सरकार राज्यात असताना देखील मंगळवेढयात मठाधिपतीस मारहाण केले जात आहे ,या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी अक्कलकोट रोड येथील होटगी मठात काशीपीठाचे जगद्गुरू डाॅ मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मठांच्या शिवाचार्यांच्या उपस्थित बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला..
यावेळी काशी पीठाचे जगदगुरु डाॅ.मल्लिकार्जुन शिवाचार्य म्हणाले की सर्व शिवाचार्य मंडळीना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सिध्दनकेरी महाराजांना मारहाण करणार्यांवर कडक शासन करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.