महाराष्ट्रराजकीयसोलापूर

मराठी परिषद सलंग्न डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार बाबर

शहर सहसचिवपदी शिवानंद येरटे यांची निवड

मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…

जिल्हाध्यक्ष पदी विजयकुमार बाबर यांची तर शहर सचिवपदी शिवानंद येरटे

सोलापूर, ता. ९ : मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवडी बाबत संस्थापक एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ( दि. ९) रोजी ऐश्वर्या हॉटेल येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्ष पदी आज तक न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटक पदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी रवि ढोबळे यांची निवड करण्यात आली.या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचचा उद्देश स्पष्ट करत, डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठविण्याची गरज असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी संघटनेचा मानस असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

अन्य कार्यकारणी याप्रमाणे :-

उपजिल्हा संघटक :-लक्ष्मीकांत शिंदे(लोकदर्शन न्यूज चॅनल ), प्रसाद दिवाणजी – जिल्हा उपाध्यक्ष (दै.तरुण-भारत संवाद ), दीपक शिराळकर – जिल्हा उपाध्यक्ष (दै.पुढारी), विनोद ननवरे – जिल्हा उपाध्यक्ष (माझा न्यूज), अप्पा बनसोडे – शहर कार्याध्यक्ष (एबीएन न्यूज), शिलरत्न इंगळे – शहर कार्याध्यक्ष (दै.सकाळ), रत्नदीप सोनवणे – शहर सचिव (एमएच दर्पण न्यूज), वैभव गंगने – शहर सहसचिव (के.सिटी न्यूज), यासीन शेख – शहर खजिनदार (आझादी बचाव), यश गुरव – शहर खजिनदार (दै.तरुण भारत सोलापूर), अमर हुमनाबादे – शहर सहखजिनदार (जयहिंद 24), प्रमोद तुपसमुद्रे – शहर सहखजिनदार (जनताराज न्यूज), रोहन श्रीराम – (द सोलापूर टाईम्स), विक्रांत कालेकर – (इन न्यूज), शिवानंद येरटे – शहर सहसचिव (सम्यक न्यूज) आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button