
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टमचा आला अहवाल
सोलापूर – पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (GBS) ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णावर सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विविध विभागाच्या चार डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलं आहे. या रुग्णाचा मृत्यू GBS मुळेच झाल्याची शंका शववि्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना होती. या शंकेचे निरसन करण्यासाठी मृतदेहाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली
मृत्यू झालेला रुग्ण हा 40 वर्षांचा होता.संबंधित रुग्णाला एका सहकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात न्यायवैद्यक तपासणी केली असता तसेच संबंधित रुग्णालयाकडून मृत रुग्णावर केलेल्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे पाहता ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (GBS) आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रासायनिक पृथ:करण्याचा अहवाल पंधरा दिवसांनी आल्यानंतर मृत्यूचे अंतिम कारण समजू शकेल. पण 100 टक्के खात्रीसाठी मेंदूतील, रक्ताचे नमुने, छोटे आणि मोठ्या आतड्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचे अहवाल हे 8 दिवसात प्राप्त होतील. त्यावेळी GBS मुळे मृत्यू आहे का हे निश्चित होईल पण प्राथमिक दृष्ट्या GBS वाटत असल्याची माहिती डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
उघड्यावरचे पदार्थ, शिळे खाऊ नका –
शिळे अन्न, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिला आहे.पोटाचा काही त्रास होतं असेल हातपायातून त्राण गेले असं वाटतं असेल तर डॉक्टरांना दाखवा असेही ते म्हणाले.काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असल्याचे डॉ.संजीव ठाकूर म्हणाले.याला घाबरुन जाण्याचे काहीही गरज नसल्याचे डॉ.ठाकूर म्हणाले.