महाराष्ट्रसोलापूर

भवानी पेठेतील 786 झोपडपट्टीमधील चार घरे जळुन खाक

वेल्डिंगची ठिणगी पडल्याने लागली आग जिवितहानी नाही

सोलापुर:दि.23,भवानी पेठेतील 786 झोपडपट्टीत वेल्डिंगची ठिणगी पडून लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही…

सोलापूर शहरातील भवानी पेठ येथील 786 झोपडपट्टी येथे इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वेल्डिंग करताना वेल्डिंगची ठिणगी शेजारच्या घरांवरील कपड्याच्या चिंध्यांवर पडून लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली. ही दुर्घटना गुरुवारी सायं 6 वाजेच्या सुमारास घडली. या चारही घरात कोणीही सदस्य हजर नसल्याने होणारी जीवित हानी टळली. आग लागल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दल आणि जोडभावी पेठ पोलिसांना माहिती दिली असता तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या हजर झाल्या. आणि लागलेली आग तात्काळ विजवली. यात झालेल्या एकूण नुकसानीची माहिती मात्र मिळू शकली नाही. यावेळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी हजर होते. यासंदर्भात नुकसानग्रस्त शमा शेख यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button