भावसार समाज ज्येष्ठ नागरिक संस्थेमार्फत ७ वा वधु-वर परिचय मेळावा संपन्न
वधु-वर परिचय मेळावा काळाची गरज डाॅ.बिराजदार

भावसार समाज ज्येष्ठ नागरिक संस्थे मार्फत ७ वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न…
वधू-वर परिचय मेळावा काळाची गरज – डॉ. बिराजदार यांचे प्रतिपादन…
भावसार समाज ज्येष्ठ नागरिक संस्थे मार्फत रविवार दि. ११ मे २०२५ रोजी स. १० ते सायं. ४ यावेळेत श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन, गणेश पेठ, सोलापूर येथे ७ वा वधू-वर पालक परिचय मेळावा’ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सोलापूर भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष राजकुमार हंचाटे होते. श्री हिंगुलांबिका देवी देवालय चे ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांच्या शुभहस्ते श्री हिंगुलांबिका देवी प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपिठावर सोलापूरातील वालचंद कॉलेजचे प्रा. डॉ. भिमाशंकर बिराजदार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. प्रथम उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना खजिनदार रविंद्र खमितकर यांनी केले. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष प्रकाश जवळकर व सचिव अरुण आकुडे यांच्या हस्ते भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून दहा पैठणी देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत रंगदळ यांनी केले.
#भावसार समाज सोलापुर #भावसार समाज महाराष्ट्र