एट्राॅसिटी दुष्कर्म प्रकरणी तरुणांस उच्च न्यायालयात जामीन मंजूर
ॲडव्होकेट रितेश थोबडे यांची माहिती

अट्रॉसिटी आणि दुष्कर्म प्रकरणी तरुणास उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर:
ॲड. रितेश थोबडे यांची माहिती…
जानेवारी २०२४ मध्ये पिडीतेची वाढपीच्या कामानिमित्त आरोपी दिनेश बाबुलाल कुमावत वय-३० वर्षे, रा.बुधले गल्ली, बाळीवेस, सोलापूर यांच्याशी ओळख झाली व फोनवर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे म्हणून हुतात्मा बगिचा सोलापूर व अक्कलकोट रोड महादेव मंदिरात फिरायला घेऊन जावून पिडीतासोबत प्रेमाच्या गोष्टी करीत होता. आरोपीने दि.२७/०३/२४ व दि.१४/०४/२४ रोजी बार्शी रोड येथे हॉटेल सुशिल पॅलेस अॅण्ड लॉजिंग येथे पिडीतास घेऊन जावून तिच्या सोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर दि.१०/०५/२४ रोजी दोघे पुणे येथे वडगावला पळून जाऊन एका खोलीमध्ये राहत होते. त्यावेळी पिडिता ही माझ्या सोबत कधी लग्न करणार आहे असे विचारले असताना तिला तु गप्पा इथेच रहायचे म्हणून शिवीगाळी देऊन दमदाटी केली. त्यानंतर
पिडिताने बहिणीस फोन करुन बोलावून घेऊन दि. 9 जुलै 2024 रोजी आरोपीस वडगाव पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. त्यानंतर पिडिताने फौजदारी चावडी पोलीस स्टेशन येथे दि.16 ऑगस्ट 2025 रोजी आरोपी विरुध्द दुष्कर्मची फिर्याद दाखल केली. तो तपासासाठी सोलापूर ग्रामीणचे उप विभागीय पो. अधिकारी संकेत
देवळेकर यांच्याकडे वर्ग झाला. तदनंतर आरोपी विरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे सोलापूर न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने अँड.रितेश थोबडे व अॅड. सचिन इंगळगी यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात
अंतरिम अटकपुर्व जामिनाचा अर्ज दाखल केला, अर्जाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायाधिश शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली. सदर पिडित व आरोपीचे शरिरसंबंध हे संमतीने झालेले असून दि. २९/०६/२४ रोजी पिडितेने पोलीसांनसमोर आरोपीबरोबर लग्न केले असल्याचे व त्यांच्या विरुध्द काही तक्रार नाही, असा जबाब दिले असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने, न्यायाधिशांनी आरोपीस अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. रितेश थोबडे यांनी गुरुवारी सकाळी 10:30 वाजता पत्रकारांना दिली. यात सरकार पक्षातर्फे ॲड. पी. पी. भोसले, तर पिडीता तर्फे ॲड. अंजली भुतिया यांनी तर आरोपी तर्फे ॲड. रितेश थोबडे व ॲड. सचिन इंगळगी यांनी काम पाहिले.