महाराष्ट्रराजकीयशासकीयसोलापूर

बसवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सामील व्हा.मनिष काळजे यांनी केले आवाहन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंगेश चिवटे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

बसवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सामील व्हा…मनिष काळजे यांचे आवाहन

 

सोलापुर.दि,२९ .वीरशैव लिंगायत धर्म प्रसारक क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्यावतीने बसवमुर्तीची भव्य मिरवणुक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायं ६ वाजता मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस येथुन सुरुवात होऊन टेलिफोन भवन,चाटी गल्ली,मंगळवार पेठ पोलीस चौकी,भुसार गल्ली,कुंभार वेस या मार्गे बसवेश्वर सर्कल येथे विसर्जित होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा बसवेश्वर सर्कलच्या सुशोभीकरणासाठी ४० लाखांचा निधी जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या प्रयत्नातून मंजुर करुन प्रत्यक्षात कामास सुरुवात करुन सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन बसवप्रेमी समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या उद्या निघणाऱ्या भव्य मिरवणूकीस बसवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्य मंडळाचे उत्सव अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी केले आहे.

#एकनाथ संभाजी शिंदे#शिवसेना एकनाथ शिंदे#बसवजयंती सोलापुर २०२५#वीरशैव लिंगायत समाज महाराष्ट्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button