क्राईममहाराष्ट्रराजकीयसोलापूर

प्रतिष्ठित व्यक्तीची सोशल मिडियातुन बदनामी

शिवबाराजे यूट्यूब चॅनेलचे निरंजन बोध्दुलसह एकावर गुन्हा दाखल

प्रतिष्ठीत व्यक्तीची सोशल मिडियातून बदनामी केल्याप्रकरणी युट्युब चँनेलचे निरंजन बोध्दुलसह एकावर गून्हा दाखल…

 

समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती श्रीनिवास संगा यांची सोशल मिडीयावर खोटी बातमी बनवून समाजात बदनामी केल्याप्रकरणी फिर्यादी श्रीनिवास संगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बालाजी नल्ला व शिवबाराजे युट्युब चॅनेलचे संपादक निरंजन बोध्दुल, दोघेही रा. सोलापूर यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी 2 वाजता गून्हा दाखल झाला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, अरोपी बालाजी नल्ला आणि निरंजन बोध्दुल यांच्यावर फिर्यादी यांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही, त्यांच्या पत्नी सोबत फिर्यादी यांचे काहीएक संबंध नाही, तसेच फिर्यादी यांची ओळख कोणत्या नेत्याशी आहे याबाबत काहीएक सांगितले नाही. विनाकारण फिर्यादीविरुध्द बदनामीकारक व्हीडीओ तयार करून ते बालाजी नल्ला व निरंजन बोध्दूल यांनी शिवबाराजे युटयुब चॅनेलवर, फिर्यादी श्रीनिवास संगा यांच्या बाबत कोणतीही खातरजमा न करता, प्रसारीत केली आहे. त्यामुळे फिर्यादी यांना मानसिक त्रास होवुन जनसामन्यामध्ये फिर्यादीची बदनामी केलेली आहे, अशी फिर्याद श्रीनिवास संगा यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन बालाजी नल्ला व निरंजन बोध्दूल यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता कलम ३५६(२) व ३ (५) प्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोह चव्हाण व पोह कांबळे हे करीत आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button