सोलापूरमहाराष्ट्र
लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीशैलम यात्रेची रथोत्सवाने सांगता
महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविक असतात उपस्थित

लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीशैलम उगादी यात्रेची रथोत्सवाने सांगता
आंध्र प्रदेशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीशैल मल्लिकार्जुन उगादी महोत्सवाची सांगता आज सायंकाळी 5 वाजता रथोत्सवाने करण्यात आली.
रथामध्ये श्रीशैल मल्लयाची उत्सव मुर्ती विराजमान करण्यात आल्यानंतर महांत मल्लय्या घे….श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय च्या घोषात मंदिर ते पादगट्टी पर्यंत हा रथ भाविकांनी ओढत आणली व परत मंदिराजवळ रथ नेऊन उगादी (पाडवा) महोत्सवाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविक महिनाभर पदयात्रेने श्रीशैलम येथे येऊन मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत असतात श्रीशैल देवस्थान प्रशासनाने भाविकांना उत्तम सोयी उपलब्ध करुन नेटके नियोजन केल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे
#Srisailam Ugadi Mahotsav