महाराष्ट्रराजकीयसोलापूर

आज वर्धापन दिन ललित ट्रान्सपोर्टचा 46 व्या वर्षात पदार्पण

वीरशैव समाजभूषण लिंगैक्य बापुसाहेब करजगीकरांनी लावलेल्या

*आज वर्धापन दिन “ललित” ट्रान्सपोर्टचा 46 व्या वर्षात पदार्पण*

लिंगैक्य बापुसाहेब करजगीकरांनी 45 वर्षापुर्वी अगदी प्रतिकुल परिस्थितीत ललित ट्रान्सपोर्टची मुहुर्तमेढ रोवली या व्यवसायात लहान बंधु गुरुनाथ व बसवराज यांनीही मोठ्या बंधुच्या खांद्याला खांदा लावत अल्पावधीतच संपुर्ण महाराष्ट्रात एक नावलौकिक कमावला.
सोलापुर शहरात तेंव्हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय तितकासा चालत नसे सातारा, कोल्हापूर,सांगली या भागातुन सोलापुरात आलेल्या ट्रक वाहतुकदारांना रिकामेच जावे लागे यावेळी बापुसाहेब व बसवराज यांनी सोलापुर जिल्ह्यातील अनेक कारखाने,सिंमेट कंपन्याशी संपर्क साधुन तिथुन सिंमेट,भुसार,कंपनीसाठी लागणारा कच्चा माल ट्रक वाहतुकदारांना उपलब्ध केला जाऊ लागला.

अशाप्रकारे ललित ट्रान्सपोर्ट यशस्वी वाटचाल करीत लिंगैक्य सिद्रामप्पा करजगीकर यांनी सराफ बाजारातील सोने चांदी व्यवसाला नवी चालना देत सराफा बाजारात करजगीकर ज्वेलर्स यांनी वेगळा ठसा उमटविला आहे.
आत्ताच्या काळात एकत्रित कुंटुब पध्दती अभावानेच पहायला मिळतात वीरशैव लिंगायत समाजातील करजगीकर परिवारास एकत्रित कुटुंब या पुरस्कारानेही सन्मानित केलं आहे.
सराफा व्यवसायात आज डाॅ.भिमाशंकर बापुसाहेब करजगीकर,हरीश बापुसाहेब करजगीकर,गुरुनाथ सिद्रामप्पा करजगीकर,गौरीशंकर गुरुनाथ करजगीकर,योगीनाथ गुरुनाथ करजगीकर हे यशस्वी वाटचाल करीत आहेत.
तर ललित ट्रान्सपोर्टची धुरा ही बसवराज सिद्रामप्पा करजगीकर व प्रशांत उर्फ ( राज) करजगीकर हे सांभाळत आहेत.
वीरशैव समाजभुषण लिंगैक्य बापुसाहेब करजगीकर यांनी दोन्ही बंधुच्या साथीने लहान रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर केले आहे.
ललित ट्रान्सपोर्टच्या वर्धापन दिनास मनःपूर्वक शुभेच्छा.

#वीरशैव लिंगायत समाज सोलापुर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button