क्राईममहाराष्ट्रसोलापूर

देवीचे दागिने चोरणाऱ्या चोरास जेलरोड पोलीसांनी केले जेरबंद

जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी

साखर पेठेतील अदिशक्ती मुत्यालम्मा देवी मंदीरातुन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अटक: जेलरोड पोलीसांची कारवाई…

 

जेलरोड पोलीस ठाणे येथे दि. २१ जानेवारी २०२५ रोजी दाखल गुन्हयात अज्ञात चोरट्याने साखरपेठ हद्दीतील अदिशक्ती मुत्यालम्मा देवी मंदीर मधील देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले होते. सदरचा गुन्हा हा समाजाच्या भावनेशी संबधीत असल्याने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन अज्ञात चोरट्याकडुन चोरीस गेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्याप्रमाणे जेलरोड पोलीस ठाणे गुन्हेप्रकटिकरण पथक प्रमुख सपोनि निलेश पाटील-सोनवणे व गुन्हेप्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सदरची चोरी उघडकिस आणली.

 

सदर आरोपीच्या ताब्यातून 8 हजार रुपये किमतीचे एक एक ग्रामचे दोन नाकातील नथ, 8 हजार रुपये किमतीचे गळयातील दोन वाटी असलेले मनी मंगळसुत्र, 20 हजार रुपये किमतीचे एक निळ्या रंगाची T.V.S EXCAL कंपनीचे मोटार सायकल असे एकूण ३६ हजार रु किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केल्याची माहिती जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व.पो.नि. शिवाजी राउत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button