सोलापूरमहाराष्ट्रराजकीय

जनसुराज्य पक्ष कार्यालयाचे थाटात उद्घाटन

जनसुराज्य पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शहराध्यक्षपदी विरेश सक्करगी

सोलापुर:दि,18.सोलापुर शहरातील विजापुर रोड सुविधानगर भागात जनसुराज्य पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जनसुराज्य पक्षाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र कोरे व नुतन शहराध्यक्ष विरेश सक्करगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपर्क प्रमुख रविंद्र कोरे यांच्याहस्ते शहराध्यक्षपद नियुक्ती पत्र विरेश सक्करगी व प्रविण कोनापुरे यांना शहर उपाध्यक्षदनियुक्ती पत्र देण्यात आले.
जनसुराज्य पक्षप्रमुख विनय कोरे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आले असुन आगामी काळात आणखी पक्ष विस्तार करणार असल्याचे संपर्क प्रमुख रविंद्र कोरे यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.
पक्षप्रमुख विनयजी कोरेंनी आपल्यावर जो विश्वास व्यक्त करुन दिलेली जबाबदारी सार्थ करुन दाखविणार असल्याचे नुतन शहराध्यक्ष विरेश सक्करगी यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर व्यक्त केले.
याप्रसंगख एडवोकेट अनिल जाधव,श्रीशैल कलशेट्टी,अनंत साखरे,अभिषेक उमदी,प्रज्वल नेसुर,अनिकेत हलसुरे पाटील,सुरेश पाटील,प्रशांत वानकर,लक्ष्मण खांडेकर यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन व आभार एड अनिल जाधव यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button