सराईत चोराकडून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
शहर गुन्हे शाखेची कामगिरी
मुळेगांव क्रॉस रोड परिसरात सराईत आरोपीकडून सुमारे साडेचार लाख रुपये सोन्या- चांदीचे दागिने जप्त, शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी…
दिनांक ७ जाने. २०२५ रोजी स.पो.नि. संदिप पाटील व त्यांच्या तपास पथकास रेकॉर्ड वरील आरोपी राजकुमार विभुते हा मुळेगांव क्रॉस रोड परिसरात पहाटे ६ वाजेच्या सुमारास तोंडास मास्क लावुन, संशयीतरित्या फिरत असताना मिळुन आला. त्यावेळी, स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडीत विभुते, वय ४३ वर्षे, रा. मु.पो. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर याला ताब्यात घेवुन, त्याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये दाखल गुन्हा असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १४७.७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८९५.३ ग्रॅम चांदीचे दागिने असे एकुण ₹ ४,४८,३००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यास सदर गुन्ह्यात अटक करून, गुन्ह्यातील गेलामाल हस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/ वि. शा. डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार- विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अर्चना स्वामी, चालक सतिश काटे, नेताजी गुंड, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र
राठोड यांनी केली आहे.
ही माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून शुक्रवारी सायं 6 वाजेच्या सुमारास प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे.