सोलापूरमहाराष्ट्र

लाखोंच्या उपस्थितीत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा संपन्न

दीड वाजता संपन्न झाला अक्षता सोहळा भाविकांतुन समाधान व्यक्त

सोलापुर,दि.13: सोलापुरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा सोमवारी दुपारी लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडला.यात्रेची 900 वर्षाची परंपरा आहे शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेत सर्व जातीधर्मातील लोकांचा सहभाग असतो.सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या समंती कट्टयावर अक्षता सोहळा पार पडला.
तत्पुर्वी सकाळी मानकरी हिरेहब्बुंच्या निवासस्थानातून सातही नंदीध्वजांचे विधिवत पुजन करुन बँड,हलगी,ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला पालखीतील सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी होती.
दिड्डयम दिड्डयम….सत्यम सत्यम…..नित्यम नित्यमच्या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरु झाले अन लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला.अपुर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या या सोहळ्यास दुपारी दोन वाजता सुरुवात झाली.एकदा…. भक्तलिंग… हर…बोला हर्र…चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता.अक्षता सोहळ्याला यंदाही लाखो भक्तांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button