महाराष्ट्रराजकीयसोलापूर

शेटे वाड्यात योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्‍वर यात्रेस प्रारंभ

रितेश थोबडेंचे सिध्दारामा चरणी साकडे

शेटे वाड्यात अ‍ॅड. रितेश थोबडे यांच्या हस्ते योग दंडाची विधिवत पूजा करून ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यात्रेला प्रारंभ

 

 

 

 

सोलापूर, (प्रतिनिधी) –

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर यांच्या हातातील दंडाची पूजा बुधवारी दुपारी शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अ‍ॅड. रितेश थोबडे यांच्याहस्ते विधिवत करण्यात आली. योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्‍वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. गेली दोनवर्षं कोरोनामुळे यात्रेवर निर्बंध लादण्यात आल्याने यंदा योगदंड पुजनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेटेवाड्याच्या प्रवेशद्वाराने वाड्याला रंगबिरंगी झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती.

अक्षता सोहळ्याच्या वधू-वरांना पाहुण्याच्या घरी बोलावुन जेऊ घालण्याची प्रथा आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर महाराजांनी साडेनऊशे वर्षांपूर्वी कै.रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते. तीच परंपरा कायम ठेवून सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या हातातील योगदंड कसब्यातील शेटे यांच्या वाड्यात आणून केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.

 

 

 

 

 

बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मानकरी सिध्देश्‍वर कंठीकर यांनी कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंड कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. त्यानंतर मानकरी वाड्यात आल्यानंतर योगदंड चौरंग पाटावर ठेवून कुमकुम फुले वाहून संबळाच्या निनादात विधिवत पूजा करण्यात आली.

त्यानंतर होम हवन करण्यात आले. कै.शेटे यांचे वारसदार अ‍ॅड.मिलिंद थोबडे यांचे चिरंजीव रितेश थोबडे यांनी मानकरी सागर हिरेहब्बू व हब्बू यांची पाद्यपूजा केली. योगदंडास केळीच्या पानामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांना 1987 पासून सिद्धेश्‍वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजा करण्याचा मान आहे. जानेवारी 2012 मध्ये 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपला वारसा चिरंजीव अ‍ॅड.रितेश थोबडे यांच्याकडे सोपविले. गेल्या 10 वर्षापासून ऍड रितेश थोबडे यांच्याहस्ते योगडांची पूजा होते. यावेळी अ‍ॅड.मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे, विजया थोबाडे, श्रद्धा थोबडे, ललिता थोबडे, सिद्धेश थोबडे, प्रणिका थोबडे, प्रतीक थोबडे, सुधीर थोबडे, विक्रांत थोबडे, गीता थोबडे,ऍड विनोद सुर्यवंशी यांच्यासह वकील बांधव आणि शहर परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button