वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अनोख्या उपक्रमाची सुरुवात
स्तुत्य उपक्रमाची शहरभर होत आहे चर्चा

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन अनोख्या उपक्रमाची सुरुवात या स्तुत्यउपक्रमाची शहरभर होत आहे चर्चा
सोलापुर-: सोलापुर शहरातील युवा नेतृत्व तुषार पवार यांनी आपले वडील कै.बंडोबा विठ्ठलराव पवार यांच्या स्मरणार्थ वाढदिवसा दिवशी होणारा अनावश्यक खर्च टाळुन निराधार,बेघर,अपंग लोकांसाठी दिवसातुन दोन वेळा जेवणाचा डबा घरपोहोच करुन “पुर्णब्र्ह्म” योजनेचा स्तुत्य उपक्रमास सुरुवात केल्याने सोलापुर शहरात या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे.
पाणीवेस तालीम येथील गणेश मंदिरात युवा नेते विक्रांत (मुन्ना) वानकर,पै.युवराज सरवदे,सुभाष गुरुजी पवार,महादेव पवार, सुनिल जाधव,अमर काशिद, संतोष कवडे, दैदीप नवगिरे, उदय रुपनर, प्रसाद पवार पंकज काटकर यांच्या हस्ते तुषार पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंकज काटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी तुषार पवार मित्र परिवार व पाणीवेस तालीम मंडळाचे असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
वाढदिवसाचा खर्च टाळुन प्रत्येकांनी अशा लोकोपयोगी उपक्रमांची सुरुवात करावी असे आवाहनही तुषार पवार यांनी केले आहे