पत्रा तालीम कार्यकर्त्यांच्या खुन प्रकरणातील आरोपीस जामीन नामंजूर
बाळु आडकेचा जामीन फेटाळला

पत्रा तालिमच्या कार्येकर्त्याचे खुनाचे प्रकरण*
बाळे येथील खून खटल्यातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला…
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ५०४, ५०६ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३) व १३५ अन्वये दंडनीय गुन्ह्यासाठी गुन्हा क्र. ३८९/२०२४ च्या गुन्हयाचा तपास करुन पोलीसांनी सदर गुन्हयांतील सर्व आरोपीविरुध्द दोषारोपपत्र मा. न्यायालयामध्ये दाखल केले. सदर गुन्हयातील आरोपी नं ०३ विजयकुमार उर्फ बाळू आडके याने भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम ४८३ नुसार जामीनासाठी दाखल केला होता.
दि. २१/०६/२०२४ रोजी दुपारी १२.३० वा. चे सुमारास मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील गट नं. ४१/३ या शेता मध्ये शासकिय मोजणी करीत असताना आरोपी नामे शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके यांनी पूर्वीचा राग मनात धरुन “ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही नाहीतर एकेकाला सोडणार नाही या हरामखोरांना संपवु” असे म्हणुन शांतप्पा आडके, सागर शांतप्पा आडके, बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इतरत्र ७ ते ८ इसम असे सर्वानी एकत्रीत येवुन त्यांचे हातातील लोखंडी कोयता, लोखंडी पाईपने भाऊ पुरुषोत्त याचे डोकिस दोन्ही हाता-पायावर,
कमरेवर, शरीरावर वार करुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फिर्यादीला लोखंडी पाईपने उजव्या खांद्यावर तसेच डाव्या पायाचे पिंडरीवर मारहाण करुन जखमी केले. म्हणुन फिर्यादीने आरोपी नामे शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इत्तर ७ ते ८ इसम यांचे विरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
सदरकामी शासनातर्फे अॅड. प्रदिपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयात म्हणणे सादर करुन युक्तीवाद कला की, वैदयकिय अधिकारी यांचा अहवाल, आरोपीकडून जप्त केलेले हत्यारे, नेत्र साक्षीदारांचे जबाब, फौजदारी प्रक्रिया संहितेचा १६४ प्रमाणे साक्षीदारांचे जबाब, निवेदन पंचनामे इतका भक्कम पुरावा सरकारकडे उपलब्ध असल्याचे सांगितले आणि तसेच आरोपी व मयत यांच्यातील पुर्व वैमनस्य व यातील आरोपींच्या नावे सोलापूर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेले गुन्हे हे ही मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यात जिल्हा सरकारी वकील श्री. प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद असा की, अर्जदारावर नोंदवलेला गुन्हा त्याला पूर्णपणे लागू आहे, तपास पूर्ण झाला आहे, अशा परिस्थितीत अर्जदाराची जामिनावर सुटका झाली तर तो दूर पळून फरार होईल. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याने ते फिर्यादी साक्षीदारांवर दबाव आणतील, खटल्याच्या वेळी ते न्यायालयात हजर राहणार नाही, आरोपीवर यापुर्वी एक व त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे गुन्हे आरोपीकडून पुन्हा – पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणास्तव सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी मा न्यायालयास आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली. या कारणास्तव त्यांनी जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. श्री. एम. एस. आझमी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांनी या गुन्ह्यातील आरोपी नामे विजयकुमार उर्फ बाळू आडके याचा जामीन अर्ज फेटाळला.
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. संतोष व्ही. न्हावकर यांनी काम पाहिले….