सोरेगाव ते नंदुर रस्त्याच्या वाहतुकीचा अडथळा
अन्यथा आंदोलन करणार रा.काँ.शप.गटाचे गणेश मोरे यांचा इशारा

*सोरेगाव ते नंदूर रस्त्याच्या वहातूकीस अडथळा करणारी काटेरी झाडे व झुडपे तात्काळ काढून घ्या:अन्यथा आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गणेश मोरे यांची मागणी*
सोरेगाव ते नंदूर या रस्त्याचे काम दि.28/12/2018 रोजी सुरू झाले होते व दि. 27/9/2019 रोजी काम पुर्ण झाले होते, सदरील काम हे सोलापूर कंस्ट्रक्शन आणि फॅबि.प्रा. लि. या ठेकेदाराकडून करण्यात आले होते, सदरील सोरेगाव ते नंदूर या रस्त्याची देखभाल दि. 27/9/2024 पर्यंत करणे ठेकेदारास बंधनकारक होते, तरी संबंधित ठेकेदाराने सोरेगाव ते नंदूर रस्त्याच्या दोन्ही बाजूची काटेरी झाडे व झुडपे काढून घेणे गरजेचे होते, परंतू ठेकेदाराने ते काढले नाही , त्यामुळे वाढलेल्या झाडा झुडपामुळे रस्त्यावरून जाताना समोरून दुसरे वाहन आल्यास बाजूला वाहन घेता येत नाही, रस्ता अपूरा पडत आहे व काटेरी झुडपे अडथळा ठरत आहेत, व समोरून येणारे वाहन दिसत नाही अपघात होत आहेत तरी सोरेगाव ते नंदूर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेली व वहातूकीस अडथळा ठरणारी काटेरी झाडे व झुडपे तात्काळ काढून घ्यावीत. व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षिणचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी बांधकाम विभागाकडे केलीय.व झाडे झुडपे काढली नसल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.