महाराष्ट्रराजकीयसोलापूर

महेश कोठेंचं जोरदार शक्तीप्रदर्शनाने रॅलीस सुरुवात

जनतेच्या मनातील आमदार मानाचा कसबा गणपतीच्यावतीने भव्य सत्कार

महेश कोठे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने रॅलीला सुरुवात

महेश कोठे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने रॅलीला सुरुवात
सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उत्तर मधील उमेदवार महेश कोठे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांची उपस्थिती होती.

महेश कोठे यांच्या रॅलीस बलिदान चौक येथून सुरुवात झाली. तुतारीच्या आवाजात निघालेली ही रॅली पुढे कुंभार वेस, बसवेश्वर महाराज पुतळा कौतम चौक मार्गे मधला मारुती टिळक चौक-कसबा गणपती-तरटी नाका पोलीस चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक-मेकॅनिकी चौक सरस्वती चौक-चार हुतात्मा चौक या ठिकाणी समारोप झाला. तिथून पुढे महेश कोठे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे, भारत जाधव, सुनिता रोटे, अक्षय वाकसे, सरफराज शेख, यांच्यासह हजारों समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
#सोलापुर राजकारण
#शहर उत्तर विधानसभा निवडणूक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button