सोलापुरात चर्चेला उधान मनसे आणि ठाकरे सेना पदाधिकारी आले एकत्र
सोलापुरातील पॅटर्न राज्यात लागु होणार का?

चर्चेला उधाण.. मनसे आणि ठाकरे सेना पदाधिकारी आले एकत्र, “सोलापुरी पॅटर्न” प्रमाणे राज्यातील दोन्ही पक्ष एकत्र येणार का.?
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने चार हुतात्मा चौकातील पुतळ्यास एकत्रित अभिवादन करण्यात आले.
राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली त्याच पद्धतीने दोन्ही पक्षातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी देखील आपल्या प्रमुखांकडे एकत्र येण्याची मागणी केली. काही कारणाने दोन्ही पक्ष एकत्र येत नव्हते सध्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आगामी महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह इतर निवडणुका लढवून भाजप महायुतीला थांबवावे असे प्रयत्न होत आहेत. राज्यात ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येण्यावर सकारात्मक चर्चा सुरू असताना सोलापुरात मात्र दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आज एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. निमित्त होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याचे. दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन अभिवादन करत आम्ही मनाने आणि विचाराने एकत्र असल्याचा संदेशच जणू राज्यातील नेत्यांना दिला आहे. ठाकरे सेना आणि मनसेचा एकत्र येण्याचा हा “सोलापुरी पॅटर्न” राज्यात जाऊन, राज्यात देखील दोन्ही पक्ष एकत्र येतील का.? हे पाहणे औचुकाचे ठरणार आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तरचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर, सोलापूर शहर संघटक सुरेश जगताप, विद्यार्थी सेना जिल्हा संघटक लहु गायकवाड, विभाग प्रमुख महेश गवळी, शाखाप्रमुख राहुल परदेशी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.