महाराष्ट्रशासकीयसोलापूर

कृषीकन्यांच्या हस्ते फोंडशिरसच्या शाळेत परसबागेची उभारणी

पोषक व सेंद्रीय शेतीचे प्रेरणादायी उदाहरण

कृषिकन्यांच्या हस्ते फोंडशिरस शाळेत पोषण परसबागेची उभारणी
– पोषक व सेंद्रिय शेतीचे प्रेरणादायी उदाहरण

दि. 10/12/2024 फोंडशिरस ता. माळशिरस जि. सोलापूर

फोंडशिरस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामतीच्या कृषिकन्या – साक्षी सोनवणे, सानिका तारळकर, शैली भराड, वसुधा भोसले, खुशी खान, आदिती पुरवंत, अश्विनी देशमुख व किरण लिमण यांनी पोषक परसबाग तयार केली. हा प्रकल्प कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत राबवला. शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात सेंद्रिय व पोषक भाजीपाला उपलब्ध व्हावा, तसेच ताज्या भाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या परसबागेत शेवगा, मेथी, कोथिंबीर, गाजर, मुळा, अळू, कढीपत्ता, कांदा, वांगी अशा विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनीही कृषिकन्यांसोबत परसबाग उभारणीच्या कामात सहभाग घेतला.

हा उपक्रम गावातील शेतकऱ्यांसमोर सादर करत, सेंद्रिय शेती व पोषक परसबागेचे महत्त्व कृषिकन्यांनी पटवून दिले. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत स्वतःच्या घरात मागे अशा बागा उभारण्याची प्रेरणा घेतली.

हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी असून शाळा व गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरला आहे. शाळा, विद्यार्थी, आणि शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button