विकास कस्तुरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
कै.मीनाताई दिगंबर ढेपे यांच्या स्मरणार्थ

विकास कस्तुरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
सोलापूर : विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने कै. मीनाताई दिगंबर ढेपे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उज्वला सुशील रत्न आदर्श पत्रकार पुरस्कार विकास कस्तुरे यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे मुख्याध्यापक अमोल ढेपे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बाळे येथील ढेपे प्रशालेत होणार आहे. हा पुरस्कार जि प चे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष दिगंबर ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुण्यनगरी चे उपसंपादक भरत कुमार मोरे, जि प सोलापूरचे सहाय्यक लेखाधिकारी किशोर बारड , महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर हे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबाबत संतोष धाकपाडे आदर्श शिक्षक धर्मा कोरे , मुकुंद माळी, सारंग पाटील, वंदना जाधव, रोहित होटकर यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
—