महाराष्ट्रराजकीयसोलापूर

कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी अमित गुंगे

कसबा गणपती मंदिरात सर्वानुमते निवड

🌟 *कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी  अमित गुंगे……*

 

कसबा गणपती शेतकरी संघटना यंदाच्या वर्षी कारहुनवी निमित्त कसबा गणपती मंदिरात सर्व शेतकरी बांधवांची वार्षिक सर्वसाधारण सभा  सुधीर थोबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.

 

या सभेत गतवर्षीच अहवाल श्री केदार मेंगाणे यांनी वाचून पुढील वर्षीची रूपरेषा मांडली आणि सन २०२५ या वर्षीचे संघटनेचे नूतन पदाधिकारी एकमताने निवड करण्यात आली आहे.

 

सन २०२५ वर्षातील नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे –

 

अध्यक्ष – अमित गुंगे

 

उपाध्यक्ष – विनायक शरणार्थी

 

सचिव – केदार कुताटे

 

खजिनदार – केदार मेंगाणे

 

प्रसिद्धीप्रमुख – पुष्कराज मेत्री

 

मिरवणूक प्रमुख – धनेश हिरेहब्बू, अप्पासाहेब कुताटे योगेश हदरे

 

कसबा गणपती मंडळ शेतकरी संघटना तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा ही कारहुनवी निमित्त बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. संघटने तर्फे उत्सव साजरा करण्याचे यंदाचे २५ वे रौप्य महोत्सव वर्ष असून माझी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल नूतन अध्यक्ष अमित गुंगे यांनी आभार मानत शेतकरी वर्गा करिता संघटने तर्फे कार्यरत राहू असे मनोगत नूतन अध्यक्ष यांनी व्यक्त केले.

 

याप्रसंगी बसवराज गाबणे, सचिन गुंगे,रोहीत कुताटे, सिद्धार्थ खुने, अर्पित गुंगे व समस्त कसबा गणपती परिवार तसेच शेतकरी बांधव ही बहुसंख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button