ज्ञानप्रबोध क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेतही ज्ञानप्रबोध क्लासेसची गरुडभरारी

सोलापुर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या प्रा.चंद्रशेखर याबाजी सर यांच्या ज्ञानप्रबोध क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत,जेईई मेन परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक २५/५/२०२५ रोजी लिंगशेट्टी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला ज्ञानप्रबोध क्लासेसची विद्यार्थीनी वैष्णवी सक्करशेट्टी हिने १०० टक्के गुण मिळवत सोलापुर शहरात व ज्ञानप्रबोध क्लासेसमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला.
क्लास मध्ये प्रथम आलेली वैष्णवी सक्करशेट्टीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, गुरुजनांना व याबाजी सरांना दिले.
अनुजा पाटील ९८.६० टक्के, वैष्णवी बिराजदार ९७.२० टक्के दर्शना आमाणे ९७ टक्के तर जेईई मेन परिक्षेत मंथन उखळकर ९३.४४, पर्सेंटाईल अक्षया बिंगी ८८.५८ पर्सेंटाईल गुण मिळवत जेईई मेन परिक्षेत घवघवीत यश मिळविले.
ज्ञानप्रबोध क्लासेसचे संचालक प्रा.चंद्रशेखर याबाजी यांनी क्लासेसच्या पंचवीस वर्षाचा यशाचा आलेख विद्यार्थी पालकांसमोर मांडला आत्तापर्यंत क्लासेसने निकालात कायम सातत्य ठेवले आहे केवळ माध्यमिक शालांतच नव्हे तर जेईई नीटसारख्या राष्ट्रीय परिक्षा पातळीवरसुध्दा यशस्वी होत असल्याचे मत प्रास्ताविकात मांडले.
प्रा.चंद्रशेखर याबाजी सर यांनी क्लासेसच्या माध्यमांतुन आत्तापर्यंत घडविलेले अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत असुन यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे कार्य प्रा.चंद्रशेखर याबाजी सरांच्या ज्ञानप्रबोध क्लासेसने अविरतपणे सुरु ठेवली आहे असे मत प्रमुख अतिथी पवन परदेशी यांनी व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थी घडविण्यासाठी याबाजी सरांचे टीमवर्क कौतुकास्पद आहे सर्व विषयांचे तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थी घडत असल्याचे प्रमुख अतिथी सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपुत म्हणाले की विद्यार्थ्यांनी डॉक्टर,इंजिनिअर या क्षेत्राबरोबरच प्रशासकीय क्षेत्रात काम करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे मनोगत व्यक्त केले.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी मेंथे मॅडम,पसारे मॅडम,सौ.विजयालक्ष्मी याबाजी व क्लासेसचे शिक्षक,शिक्षिकावृंद,पालक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चंद्रशेखर याबाजी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कोरे सर यांनी मानले
#शैक्षणिक #एसएससी बोर्ड परिक्षा