महाराष्ट्रराजकीयसोलापूर

सोलापुरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे सेनेच्या वाटेवर

उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुप्त भेट

सोलापुर:दि,११.सोलापुर शिवसेनेतील गळती थांबता थांबेना अशीच झालेली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव पक्षात आलेली मरगळ अशा अनेक कारणावरून पक्ष सोडण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे.

याबाबत एका स्थानिक पदाधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर एक शहप्रमुख व तालुकाप्रमुख शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक बातमी असल्याचे सांगितले.

सांगोला येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता या कार्यक्रमास हे दोन पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.

दक्षिण सोलापुर जिल्हाप्रमुखपदी संतोष पाटील यांच्या नियुक्तीला या पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचेही बोलले जात आहे याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी संपर्क केला असता या वृत्तास दुजोरा दिला आहे.

#शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे#सोलापुर घडामोडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button