किडवाई चौकातील खोदकामाबाबत जिल्हा कारागृह वर्ग २चे अधिक्षकांचा खुलासा

किडवाई चौकातील खोदकामाबाबत जिल्हा कारागृह वर्ग २ चे अधिक्षक आणि पालिका आयुक्तानी केला खुलासा…
बुधवार, दि. 9 एप्रिल रोजी पाण्यासंदर्भात ज़िल्हा कारागृहातील कैद्याना घेऊन किडवाई चौकात खोदकाम करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हा कारागृह वर्ग २ चे अधिक्षक यांनी खुलासा केला आहे. सोलापूर जिल्हा कारागृहाची अधिकृत बंदी क्षमता १४१ असताना सध्या कारागृहामध्ये ५५० अर्थात क्षमतेपेक्षा चारपटीने अधिक बंदयांची संख्या आहे. बंदी कारागृहामध्ये महानगर पालिकेचे एक इंच २४ तास पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन सुरु आहे. तसेच शासकिय वसाहती करिता दोन इंच चार दिवसातून एक वेळेस पाणीपुरवठा करणारे कनेक्शन सुरु आहे. बंदयांची संख्या वाढल्याने व सध्या उन्हाळा सुरु असल्याने पाण्याची प्रचंड टंचाई भासत आहे. चार दिवसांपासून कारागृहामध्ये पाणी पुरवठा अत्यंत दुषित येत आहे. कारागृहामध्ये पाण्याची टंचाई असल्याने कारागृहातील बंदयांनी मानवी हक्क आयोग, सेशन कोर्ट, माळशिरस, अतिरिक्त सत्र न्यायालय ३, सोलापूर यांना पाण्यासंदर्भात तक्रारी अर्ज केलेले आहेत. न्यायालय यानीं सुध्दा सोलापूर महानगर पालिका आयुक्ताना तात्काळ पाण्याचा पुरवठा करण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून कारागृहास दोन इंची पाईप लाईनचा पाणीपुरवठा करण्याबाबत दि. १७ सप्टेंबर २०२४ पासून पाठपुरावा सुरु आहे. सोलापूर महानगर पालिकेने दोन इंची पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शनाबाबत मान्यता दिल्याने व लागणारा खर्च महानगर पालिकेस अदा करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार खोदकाम संबंधित अर्जदाराने करायचे असल्याने महानगर पालिकेच्या अधिका-याशी वारंवार संपर्क करुन तात्काळ बंदयांकरिता पाणी कनेक्शन देण्याबाबत विंनती केलेली आहे. कारागृहात बंदयांना वेळेवर व स्वच्छ पाणी मिळण्याच्या उददेशाने तसेच दूषित पाण्यामुळे बंदयांच्या जिवीतास धोका निर्माण होवु नये म्हणुन बंदयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोणातून सदरचे खोदकाम हे कारागृह अधिकारी व कर्मचारी यांचे पुर्णपणे चोख बंदोबस्तात करण्यात आले. तसेच खोदकाम करतेवेळी महापालिकेचे अधिकारी हे स्वतः उपस्थित राहिल्यानंतर कारागृहातील बंदयांमार्फत खोदकाम सुरु केले होते. खोदकाम करणा-या बंदयांना नियमानुसार कारागृह प्रशासनाकडून वेतन देण्यात येते, असा खुलासा सोलापूर जिल्हा कारागृह वर्ग २ चे अधिक्षक यांनी बुधवारी रात्री प्रेस नोटच्या माध्यमातून केला आहे.
तर दुसरीकडे पालिका आयुक्तांनी देखील खुलासा केला आहे. खुलाशात ते म्हणतात की पालिकेचा अधिकारी समोर नसताना व आम्हाला माहिती न देता परस्पर खोदाई करण्यात आली आहे. पालिकेस कारागृह विभागाने अद्याप शुल्क भरले नाही. कारागृह अधिकारी आम्हाला येवून भेटले होते. पण शुल्क न भरताच पाणी पुरवठा २ इंची लाईन देण्याची केली होती मागणी त्यांनी केली होती.
#सोलापुर घडामोडी