महाराष्ट्रराजकीयशासकीयसोलापूर

शिवराज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे काम पुर्ण करा

शिवजन्मोत्सव मध्य महामंडळाकडुन मनपा आयुक्त डाॅ.सचिन ओंबांसे यांना निवेदन

शिवराज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याचे काम पुर्ण करा

शिवप्रेमींची मनपा आयुक्त डाॅ.सचिन ओंबासेना निवेदन

 

सोलापुर, दि.4.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे या संदर्भातले निवेदन श्री शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना देण्यात आले.

 

यावेळी ट्रस्टी अध्यक्ष, माजी उपमहापौर नाना काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, श्रीकांत घाडगे,श्रीकांत डांगे, ज्ञानेश्वर सपाटे, विश्वनाथ गायकवाड,गणेश डोंगरे,सचिन स्वामी, पुकाळे, देविदास घुले यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी विषय लक्षात घेऊन आणि जनभावना लक्षात घेऊन लागलीच सारिका अकुलवार (नगर अभियंता) यांना फोन लावून पुतळा सुशोभीकरण विषयाची माहिती घेतली.

 

त्याचबरोबर दिनांक 15 मे पूर्वी कोणतीही सबब न देता काम पूर्ण करण्याच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरला देण्याची तसेच नगर अभियंता यांनी सदर काम 15 मे पर्यंत पूर्ण करावे असे सांगत कामासाठी डेडलाईन दिली.

 

 

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डॉ.सचिन ओंबासे यांच्या तात्काळ कार्यवाहीबद्दल च्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.

 

 

ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांनी माध्यमांशी बोलताना सदर काम 15 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास शिवप्रेमींच्या रोषाला महानगरपालिकेला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी दिला.

#सोलापुर शहर घडामोडी#छत्रपती शिवाजीमहाराज #सामाजिक #राजकीय

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button