श्री.सिद्धेश्वर सेवा संस्थच्यावतीने श्रीशैलम येथे उगादी उत्सवासाठी
महाअन्नदासोहचे आयोजन शंभर युवकांचा सहभाग

श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीने श्रीशैलम येथे उगादी उत्सव निमित्त महाअन्नदासोहाचे आयोजन..
सोलापूर:- श्रीशैलम येथे गुढीपाडव्यानिमित्त उगादी रथ उत्सव यात्रा मोठ्या प्रमाणात संपन्न होतो या उगादी उत्सव साठी महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा येथील पाच ते दहा लाख भक्तगण दर्शनासाठी येतात.यासाठी येणाऱ्या भक्तगणांसाठी श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीने १ लाख ते दीड लाख भक्तगणांना दिनांक २५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत रोज भात,आमटी व गोड पदार्थ असे सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येते. ३००किलो बालुशाही ३०० किलो जामुन,300 किलो बुंदी लाडू असे पदार्थ सोलापुरात तयार करण्यात आले आहेत, तसेच शिरा, हुग्गी, करगडबा श्रीशैलम येथे बनवण्यात येणार आहे या महाअन्नदासोहासाठी सोलापुरातील दानशूर व्यक्तींनी धान्याच्या स्वरूपात व देणगी स्वरूपात सहकार्य केला आहे.
स्वयंपाक साठी टीम २० महिला आचारी व 80 भगिनी चडचण, विजापूर,सोलापूर,गुलबर्गा येथून सेवेसाठी उपस्थित असतात
१०० युवकांचा संघ परिश्रम घेत आहेत गुरुनाथ निंबाळे,अनिल बेउर श्रीशैल कोळी, सोमशंकर माशाळकर, राजू वाले,नागराज बिराजदार, किरण अक्कलकोटे,विरेश बिराजदार, नितीन भिंगोळी, गुरु माशाळकर,सोमनाथ पटणे, प्रशांत रासुरे, सुदेश बाभूळगावकर, राजू बेऊर, आकाश वाघमारे, रोहित भुमकर, प्रतीक साखरे, प्रथमेश होनराव,आदित्य गुरव,सोमनाथ म्हेत्रे, सिद्धाराम येणेगुरे सह अनेक कार्यकर्ते या महाअन्नदासोहासाठी परिश्रम घेत आहेत..
*अध्यक्ष सिद्धाराम शेट्टी.*
गेल्या दहा वर्षापासून श्रीशैलम येथे गुरु कपिलसिद्ध मल्लिकार्जुन महाराजांच्या पुण्यनगरीत सोलापूर येथून महाप्रसादाचे साहित्य व आचारी कार्यकर्तेसह जाऊन सेवा करीत आहोत ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांना कपिलसिद्ध मल्लिकार्जुन महाराज यांनी सोलापुरात आले असता दहिभाताची त्यांच्याकडे मागणी केली होती हे गुरु शिष्याचे अनोखी भेट भावी पिढीस काळावी यासाठी ही सेवा आम्ही अखंडितपणे सुरू ठेवली आहे..