सोलापूरमहाराष्ट्रराजकीय

जेलमध्ये लिहिली जिवलग मित्राची आत्मकथा

आमदार विजयकुमार देशमुख व मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन

जेलमध्ये लिहिली जिवलग मित्रासाठी आत्मकथा

आमदार विजयकुमार देशमुख व मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन

 

सोलापुर दि.24, निलेश महामुनी लिखित “मित्रप्रेम” या आत्मकथेचा पुस्तक प्रकाशन सोहळा शुक्रवार पेठेतील चौडेश्वरी मंगल कार्यालयात सोमवार दि.24/2/2025 रोजी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख,शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल (बापु) शिंदे, समीर गायकवाड, महेश धाराशिवकर,यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

पुरातन काळापासुन श्रीकृष्ण सुदामा,छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या मैत्रीवरील अनेक किस्से कथा आपण आजतागायत वाचतोय.

अशीच एक दोन जिवलग मित्रांची कथा कारावास भोगत असताना आपला जिवलग मित्र स्वर्गीय ऋतुराज (बाबा) सुरेश शिंदे यांच्यावर लेखक निलेश महामुनी यांनी पुस्तकरुपात जगासमोर आणलीय.

लेखक निलेश महामुनी यांनी हे पुस्तक जिवलग मित्र स्वर्गीय ऋतुराज ( बाबा ) सुरेश शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस तसेच मैत्री जपणाऱ्या मैत्रीसाठी जगणाऱ्या आणि मैत्रीसाठी मरणही पत्करणाऱ्या अशा सर्व मित्रांना अर्पण केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button