सिद्धेश्वर भक्तांनी प्रज्वलित केली समतेची दीपज्योत
पंचकट्टा शेजारील पुरातन दीपमाळ प्रज्वलित

सिद्धेश्वर भक्तांनी प्रज्वलित केली समतेची दिपज्योत….
पंचकट्टा शेजारील पुरातन दिपमाळ प्रज्वलित
सोलापुर:दि-15, ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरासमोरील पंचकट्टा येथे बाराव्या शतकातील दोन डिकमल अर्थात (दीपमाळ) असुन परंपरेनुसार त्या ठिकाणी मकरसंक्रांती काळातील सिद्धेश्वरांच्या अक्षदा सोहळा,दिवाळी,श्रावण महिन्यात दोन्ही दीपमाळ प्रज्वलित केल्या जात होत्या.
परंपरेनुसार या दोन्ही दीपमाळ प्रज्वलित करण्याचा पुर्वापार मान हा सोलापुर शहरातील चांभार व ढोर समाजाला असुन ते या दोन्ही दीपमाळ प्रज्वलित करीत असतात पण गेल्या सत्तर वर्षांपासून दीपमाळेचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात असुन ही परंपंरा खंडित झालेली होती.
याविरोधात सिद्धेश्वर भक्त मंडळाचे विजय चोळ्ळे सिद्धेश्वर भक्तांनी आक्रमक पवित्रा घेत दोन्ही दीपमाळा मुक्त करुन संत रोहिदास जयंतीदिनी समतेची दीपज्योत प्रज्वलित केली.
याप्रसंगी सिद्धेश्वर भक्त मंडळ अध्यक्ष विजय चोळ्ळे,विठ्ठल व्हनमारे,बापुताज पाटील,संतोष तांबुलकर,शिवशंकर दोडमनी,सनी पाटील यांच्यासह सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते