संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवुन महिलेवर अत्याचार
सोलापुरातील नामांकित प्रदीप सोहालाल शिंगवीसह दोघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवुन महिलेवर दुष्कर्म
उत्तर सोलापुर तालुक्यातील एका संस्थेमध्ये मुंबईच्या महिलेला अधिक्षकपदी नोकरी लावतो असे आश्वासन देऊन दुष्कर्म केल्याप्रकरणी सोलापुर शहरातील नामांकित व्यक्तीसह तिघांविरुद्ध अत्याचार व एट्राॅसिटी अंतर्गत तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप सोहालाल शिंगवी (रा.मंगळवार पेठ सोलापुर) रेखा गुप्ता शिलवंती बिराजदार दोघेही राहणार सोलापुर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत 15 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईत राहणाऱ्या महिलेच्या एका व्हाटसअप ग्रुपवर जाहिरातीची पोस्ट आली जाहिरातीमध्ये सोलापुरातील नामांकित संस्थेत अधिक्षक व सदुपदेशक पदासाठी अर्ज करावे असे नमुद करण्यात आले होते त्यानुसार महिलेच्या मैत्रिणीने तिला फोन करुन माहिती घेण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार महिलेने त्या संस्थेत फोन लावला व तो फोन प्रदीप शिंगवी यांनी उचलला बोलणे झाल्यानंतर महिलेला सोलापुरला येण्यास सांगितले.
14 ऑक्टोबर 2024 रोजी महिला सोलापुरात आली महिलेची मुलाखत झाल्यानंतर तिला लगेच नोकरीवर रुजु होण्यास सांगितले मात्र महिलेने एपाॅइंटमेट लेटरची मागणी केली त्यानंतर महिला मुंबईला निघुन गेली नंतर तिला फोन करुन संस्थेत जाॅईन होण्यास सांगितले.
संस्थेत राहण्यास खोली दिली व कामास सुरुवात झाली दरम्यान महिलेला जात विचारण्यात आली मागासवर्गीय असल्याचे सांगितल्यानंतर संस्थेतील अन्य महिलांनी तिच्याशी वेगळा व्यवहार करु लागल्या.शिवाय प्रदीप शिंगवी यांने महिलेला तुला जर एपाॅइंटमेट लेटर पाहिजे असेल तर मी सांगेल तसं करावं लागेल असे म्हणून 18 नोव्हेंबर रोजी महिलेवर दुष्कर्म केला त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी असाच प्रकार केला.