सोलापूरमहाराष्ट्रराजकीयशासकीय

व्यापारी संघटनेच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरची आडत व्यापारी संघटनेचा दोन्ही उमेदवारांना जाहिर पाठिंबा

व्यापारी संघटनेच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

सोलापुर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून अनेक उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला असुन सर्व व्यापारी संघटनेचे अधिकृत उमेदवार मुश्ताक अहमद सरदारसाब चौधरी वैभव चंद्रशेखर बरबडे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी आठ वाजता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील चौधरी गोडाउन पासुन फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य प्रचार रॅलीस सुरुवात करण्यात आली.

फळे भाजीपाला मार्केट,कांदा मार्केट,फुल मार्केट,बारदान मार्केट,मिरची मार्केट या ठिकाणी व्यापारी मतदारांच्या गाठी भेट घेत मतदानाचे आवाहन केले.

यावेळी व्यापाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांचे हार घालुन फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

प्रचार रॅलीस सर्व बाजार समितीत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असुन व्यापारी संघटनेचे दोन्ही उमेदवार हे सक्षम असुन आमचा विजय निश्चित असल्याची भावना कस्तुरबा मंडई व्यापारी अध्यक्ष रेवणसिद्ध आवजे यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर व्यक्त केली.

यावेळी आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिकळ्ळी,सोलापुर कॅन्व्हासिंग एजंट असोसिएशन अध्यक्ष श्रीशैल अंबारे,कस्तुरबा भाजी मंडई व्यापारी असो हंगामी अध्यक्ष रेवणसिद्ध आवजे,सोलापुर दाळ मिल ओनर्स असो अध्यक्ष प्रविण भुतडा,राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई व्यापा असो अध्यक्ष रियाज बागवान,किराणा मसाला व्यापा असो अध्यक्ष प्रविण ओसवाल,मिरची आडत व्यापारी संघ अध्यक्ष अयुब कल्याणी,बारदान व्यापा संघअध्यक्ष मल्लिनाथ कटाप,ऑईल मिल ओनर्स असो अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी, मिरची आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष अयुब कल्याणी, प्रकाश विभुते,केदारनाथ उंबरजे,गजानन होनराव,सिध्दाम बावकर, सिध्दु बिराजदार यांच्यासह मार्केट यार्डातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Vijaykumardeshmukh #Subhashdeshmukh #SachinKalyanshetti#dilipMane#RajshekharShivadare

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button