महाराष्ट्रसोलापूर

योगदंडाचा हळद काढण्याचा धार्मिक विधी

योगदंड,नंदीध्वजांना "करमुटगी" लावुन स्नान

सोलापुर: दि.14, ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेतील तिसर्‍या दिवशी मंगळवारी सिध्देश्‍वर तलावात योगदंड, मानाचे सातही नंदीध्वज, श्रींची मुर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा धार्मिक विधी झाला.
दरम्यान सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या व दुसऱ्या या दोन्ही नंदीध्वजांची मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्याहस्ते विधीवत पूजा करण्यात आला. करमुटगी स्नान या धार्मिक विधीसाठी मिरवणुकीने योगदंड, नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यातून दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस मार्गे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संम्मती कट्ट्याजवळ आले. त्यानंतर प्रथम श्रींची मुर्ती व योगदंड, नंदीध्वजास करमुटगी लावून सिध्देश्‍वर तलावात स्नान घालण्यात आला. स्नान घालून हळद काढण्याचा विधी झाला.
हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते सतीचे वाण म्हणून दुरडीची पूजा झाली. त्यानंतर मानकरी कंटीकर यांनी तलावात दुरडीचे विर्सजन केले. नंदीध्वजांना करमुटगीने स्नान घातल्यानंतर नंदीध्वज, अमृतलिंग, श्रींच्या गदगीस नैवैद्य दाखविण्याचा मान कसब्यातील देशमुख यांना आहे. त्यांच्यावतीने नैवैद्य दाखविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button