विचार हा वक्तृत्वाचा आत्मा उद्योजक विष्णु भुमकर
वैं.बाबुरावसा भुमकर स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

*विचार हा वक्तृत्वाचा आत्मा*
-विष्णू भूमकर
सोलापूर, दि. -( 29)-‘वक्तृत्व कलेला वाव देण्यासाठी तसेच वक्तृत्व कौशल्याच्या विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित होणे गरजेचे आहे. शब्द हे वक्तृत्वाचे शरीर आहे तर विचार हा वक्तृत्वाचा आत्मा असतो. वक्त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नाना विविध रस ही वक्तृत्वाचे आभूषणे असतात’ असे प्रतिपादन नामवंत उद्योजक विष्णू भुमकर यांनी केले.
सहस्त्रार्जून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावसा भूमकर यांच्या स्मरणार्थ सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजीव बिद्री,जयकुमार कोल्हापुरे,शैक्षणिक संस्थेचे सदस्य अनिल रंगरेज, भरतकुमार शालगर , गणेश दामजी, शिरीष कोल्हापुरे , सुरेश बिद्री, प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा काशीद, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ. विष्णू रंगरेज आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उद्योजक विष्णू भुमकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी शहरातील विविध प्रशालांमधून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. सायरा मोगल ,शिवाजी रानसर्जे,धर्मराज हिपळे ,प्रा.शिवराज पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम खत्री यांनी केले तर सौ. वैशाली अघोर यांनी आभार मानले.
विजेत्या स्पर्धकांची नावे- प्रथम- अर्चिता चंद्रशेखर धप्पाधुळे-एस.व्ही. सी.एस. प्रशाला ,द्वितीय विभागून- पावनी नितीन हिबारे, एस.आर.चंडक हायस्कूल व झेबा जहांगीर शेख- संभाजीराव शिंदे प्रशाला ,तृतीय- स्नेहा काशिनाथ कोरे -सहस्त्रार्जुन प्रशाला विभागून केदार अविनाश वळसंगकर- दमानी प्रशाला, उत्तेजनार्थ- श्रेया प्रकाश कतनाळे- सिद्धेश्वर कन्या प्रशाला ,सारिका महेश शिवगुंडे- दयानंद काशिनाथ आसावा प्रशाला.